तेलंगणातल्या यादाद्रीगुट्टा येथील श्रीलक्ष्मी नरसिंहस्वामी मंदिरात कंकडालवार कुटुंबीयांची विशेष पूजा-अर्चना कार्यक्रम संपन्न…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….प्रतिनिधी….
गडचिरोली : तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद या शहरापासून लगबग ७० कि.मी अंतरावर यादाद्रिगुट्टा येथे श्री.लक्ष्मी-नरसिंहस्वामी या देवाची प्रख्यात पुरातन मंदिर आहे. या मंदिरात जाऊन काँग्रेस अहेरी विधानसभा समन्वयक व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकाडालवार यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबियांसंमवेत जाऊन श्री लक्ष्मी नरसिंहस्वामी देवाची दर्शन घेऊन विशेष पूजा अर्चना केले.यावेळी अजयभाऊ कंकडालवार यांनी समस्त शोषित,वंचित व पीडितांसह शेतकरी,शेतमजुर व मजूर बांधवाना समृद्धी प्राप्त होवून सुजलाम सुजलाम होवो अशी देवाकडे साकडे घातले.
तेलंगणातील यादाद्रिगुट्टा येथे श्री.लक्ष्मी नरसिंहस्वामीची अति प्राचीन मंदिर असून या मंदिराला अनन्य इतिहास आहे.या मंदिराचे दररोज देश विदेशातील हजारो भक्त दर्शन घेत असतात.या मंदिराचे पूर्णबांधणी करण्यासाठी तब्बल सहा वर्षे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली होती.मंदिराचे नव्याने पूर्णबांधणी बांधकाम पूर्ण झाल्याने सदर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुल करण्यात आली आहे.या मंदिराची सुंदर असे वास्तुकला व शिल्पकला हे प्रचिनकाळातील आहेत. तेलंगणात या मंदिराला टेम्पल सिटी म्हणून नव्याने ओळख मिळाली आहे.
अतिशय मनाला प्रसन्न करणाऱ्या या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य असून नक्कीच भाविकांनी दर्शन घ्याव.या मंदिरात जाऊन आल्यानंतर व देवाची दर्शन घेतल्यानंतर नवी चेतना जागृत झाली असून आम्हा सर्वांना समाधान झाल्याचे अजयभाऊ कंकडालवार व त्यांचे परिवारांनी दर्शनानंतर बोलून दाखविलें.