सामाजिकसिरोंचा तालुका

सिरोंचा येथे जि.प.माजी अध्यक्ष भाग्यश्री हलगेकर(आत्राम)यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
तालुका प्रतिनिधी सिरोंचा

सिरोंचा:- अहेरी विधानसभा मतदारसंघांचे युवानेतृत्व माजी जिल्हापरिषद अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठचे सिनेट सदस्य सौ.भाग्यश्रीताई हलगेकर(आत्राम) यांचा वाढदिवस शुक्रवारी सिरोंचा येथे (दिनांक 6 ऑक्टोबर) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे.यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते.स्वगृही स्नेहधर्म म्हणजे कार्यकर्त्यांच्या बैठकी सभागृहात भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले.या रक्तदान शिबीरात रक्तदाते कृष्णमूर्ती तोकला अंकीसाचे सामाजिक कार्यकर्ते चेतनजी राव,जानमपल्ली उपसरपंच नागराजू गणपती,विजय काटबोईना,राकेश दासरी,राजू पुल्लूरी,नरेश रिक्कूला,अंकुलु बापू मूलकला,विक्की मारशेट्टी,राजबापू सिडाम,सम्मय्या तोकला,राकेश राऊत,रवी सुलतान,यांनी उस्फुर्त रक्तदान केले,या रक्तदान शिबिरासाठी आलेले संबंधित अधिकारी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी श्री.डाँ अश्विन वलके साहेब,वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी वाठोरे,रक्तकेंद्र तंत्रज्ञ सरिता वाघ,रक्त संकलन तंत्रज्ञ शिरीन कुरेशी,समुदाय आरोग्य सेवक नरेश कंदकुरी,महेश कोंडी यांनी रक्तसंकलनची जबाबदारी पार पाडली.तसेच सिरोंचा येथील इंदिरा चौकात कार्यकर्त्यांनी अन्नदान करून वाढदिवस साजरा केले. यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधूकर कोल्लूरी,जानमपल्लीचे सरपंच मधुकर आत्राम,उपसरपंच नागराजू गणपती,नगरसेवक सतीश राचारला,नगरसेवक रंजित गागापुरपूवार,नगरसेविका सौ.सपना सम्मय्या तोकला,समाजसेवक सम्मय्या तोकला,सामाजिक कार्यकर्ते रवी सुल्तान,कमलाकर ताटीकोंडावार के बी.जवाजी,जेष्ठ कार्यकर्ते चेतन राव ,महेश वरके,सुधाकर सिडाम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close