जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची जाफ्राबाद येथील युवा शेतकरी नागेश दुर्गम यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील जाफ्राबाद येथील ग्रामपंचायत सदस्य व अजयभाऊ कंकडालवार मित्रपरिवारचे कट्टर समर्थक महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ युवा शेतकरी नागेश दुर्गम यांनी काल काही कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केली होती.त्यांच्या मृतदेहावर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आली.नंतर त्यांच्या कुटुंबियांना मृतदेह सुपूर्द करण्यात आली. या तरुणाच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.या दुःखद निधनाची माहिती आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच त्यांनी वेळेचे विलंब न करता जाफ्राबाद येथे जाऊन नागेशच्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी दुर्गम कुटुंबियांचे सांत्वन करून पुढील कार्यक्रमासाठी दुर्गम कुटुंबाला आर्थिक मदत केले.
याअंत्यसंस्कार कार्यक्रमाला माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,दुर्गम चंद्रय्या माजी जि.प.सदस्य,सुधीर मुद्मगेला,विजय गैदारी,शंकर गेडाम ग्रां.प.सदस्या,प्रवीण इटुरी,विजय रेपालवार,नारायण मूडमडीगेला,नरेश गर्गम,प्रकाश दुर्गे,राकेश सडमेक,प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.