राज्य
आवलमरी येथील आगग्रस्त गग्गुरी कुटुंबियांना जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्कअहेरी तालुक्यातील आवलमरी येथे आज पहाटे रमेश राहुलवार यांच्या घराला अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे. सदर बाब जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच आवलमरी येते जावून पाहणी केली.तेव्हा गावातील नागरिकांनी सांगितले कि,सदर आगीत लहान बालक शिवा व्येंकटी गंगूरी वय ११ महिने हे गंभीर जखमी असुन रूग्णालयात भरती करण्यात आल्याच सांगितले जि.प.अध्यक्ष यांनी क्षणचा विलंब ना करता रूग्णालयात जावून गंगूरी परिवाराशी भेट घेवून कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.अजय नैताम ,प्रशांत गोडसेलवार,प्रकाश दुर्गे,संजय गोन्डेवार,राकेश सड़मेक,आदि उपस्थित होते.