Uncategorized

मेडिगड्डा प्रकल्प बाधित शेतकरी व सिरोंचा-आल्लापल्ली रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जनआंदोलन उभारू ….माजी आमदार दिपक दादा आत्राम

मेडिगड्डा प्रकल्प बाधित शेतकरी व सिरोंचा-आल्लापल्ली रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जनआंदोलन उभारू *माजी आमदार दिपक दादा आत्राम* *सिरोंचा*....मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्प हे संपूर्ण तालुक्यासाठी अभीशाप ठरले असून या प्रकल्पामुळे बाधित शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी जनता रस्त्यावर पडले,शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले तरीही संबंधित प्रकल्पाचे अधिकारी बाधितांना आवश्यक मदत करण्याऐवजी मूग गिळून बसले,सोबतच मागील तीन वर्षांपासून सिरोंचा-आल्लापल्ली या रस्त्यावर खूप मोठं मोठे खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावं लागतं आहे,असे असतानाही या रस्त्याचे पक्के बांधकाम तर सोडाच साधे खड्डे बुजविण्याचे कामाला सुद्धा सुरुवात झाल्याचे कुठेही दिसून येत नाही,

असे अनेक ज्वलंत समस्या आवसून उभे आहेत,त्या सर्व समस्या सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी व तालुक्यातील समस्यांची तात्काळ निपटारा व्हावं,यासाठी आपण लवकरच जनआंदोलन उभारू,अशी माहिती आविसंचे विदर्भ नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी कार्यकर्त्यांना दिली.ते येथील स्थानिक विश्रामगृहात आयोजित आविसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना ग्वाही दिली. शुक्रवारला येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आविसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम हे प्रामुख्याने उपस्तीत होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना माजी आमदार दिपक आत्राम पुढे म्हणाले,मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला सर्वप्रथम आविसने ही तीव्र विरोध केला होता. प्रकल्प नको म्हणून आविस ने शेवट पर्यंत लढा दिला,प्रकल्प विरोधात लढत असतांना आविसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्याअंगावर गुन्हेही दाखल झाले, आविसच्या विरोधाला न जुमानता तेलंगणा सरकारने प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण केले.अन या प्रकल्पाची फटका ही तालुक्याला बसला.मेडिगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे भविष्यात सिरोंचा तालुक्याला खूप मोठं फटका बसेल हे आम्ही 2016 मध्येच विविध आंदोलनाच्या माध्यमातून सांगितल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखविले. सिरोंचा-आल्लापल्ली या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचं रूपांतर आता तलावात झाल्याचे दिसून येत आहे, तालुक्यातील समस्या सोडविण्यात स्थानिक आमदार अपयशी ठरले असून मेडिगड्डा बाधित शेतकऱ्यांना एकरी तीस ते पन्नास लाख रु.मदत मिळवून देण्याचे त्यांचे आश्वासन ही हवेत विरल्याचेही यावेळी त्यांनी टीका केले. आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुन,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जंनगम,नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू पाशा,माजी सरपंच विजय कुसनाके,जाफराबाद ग्रा.पं.चे सरपंच बापू सडमेक,बांधकाम सभापती नरेश अलोने,आविस सल्लागार रवी सल्लम,सिरकोंडाचे सरपंच लक्ष्मण गावडे, ज्येष्ठ नेते सुधाकर पेद्दी,वेंकटापूरचे सरपंच अजय आत्राम,नारायणपूरचे उपसरपंच अशोक हरी,नागराजु इंगीली,कोपेलाचे उपसरपंच सुरेश मडे,नगरसेवक इम्तियाज शेख,नारायण मुडमडीगेला,जुलेख शेख,रवी बॉंगोनी,मारोती गणापूरपू,साई मंदा,पत्रकार तिरुपती चिटयाला,न.पं.स्वीकृत सदस्य राजेश बंदेला,वासू सपाट,सारली दुर्गम,नागेश दुग्याला,वेंकटस्वामी मुत्याला,दुर्गेश लंबाडी,लक्ष्मण बोल्ले,गोडम श्रीनिवास,गणेश रचावार सह आविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close