मूलचेरा तालुकासामाजिक

ईथे विद्यार्थ्यांना करावी लागते,रापम बससाठी तीन ते चार तास ताटकळत प्रतीक्षा!..

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…मूलचेरा
माजी आमदार दीपक दादा आत्राम यांनी आगार प्रमुखासोबत बसफेऱ्या वाढविण्या संदर्भात केली चर्चा

मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथे शाळा व कॉलेजमध्ये आजूबाजुच्या गावांतुन शिक्षणा साठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेज सुटल्यानंतर बस च्या प्रतीक्षेत गावी जाण्यासाठी तब्बल 3 ते 4 तास ताटकळत उभे राहावे लागण्याचे भीषण वास्तव सामोरे येत आहे. माजी आ.दीपक आत्राम हे गडचिरोली वरून आल्लापल्ली परतताना त्यांना आज(शनिवारी) दुपारी सुंदरनगर येथिल बाजार चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एका दुकानासमोर उभे दिसले या बाबत माजी आ.दीपक आत्राम यांनी विध्यार्थ्यांकडे या बाबत चौकशी केली असता आमची शाळा/कॉलेज 12 वाजताच सुटले मात्र दुपारी 3वाजेपर्यंत बस न आल्याने आम्ही आमच्या गावी जाण्यासाठी बसची वाट बघत उभे आहोअसे सांगितले .
विद्यार्थी वर्गाची अडचण लक्षात घेता माजी आ.दीपक आत्राम यांनी तात्काळ अहेरी येथील एस .टी महामंडळाचे आगार प्रमुख युवराज राठोड ,गडचिरोली येथील विभाग नियंत्रक वाडीभस्मे यांना फोन लावून याबाबत कळविले व या मार्गावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस फेऱ्या वाढवण्याची मागणी केली .
सोबतच लागलीच अहेरी येथील आगारात येऊन आगार प्रमुखासोबत चर्चा केली .चर्चेअंती या मार्गावर विध्यार्थ्यांसाठी शाळा सुटण्याअगोदर 1 तास आधी अहेरी येथून एक बस पाठविण्याचे आश्वासन आगार प्रमुख युवराज राठोड यांनी माजी आ.दीपक आत्राम यांना दिले.
माजी आमदार दीपक आत्राम यांच्या प्रयत्ना मुळे विध्यार्थी वर्गाची होणारी गैरसोय टळणार आहे.
यावेळी चर्चेवेळी सोबत माजी जि प सदस्य संजय चरडुके,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,विनोद कावेरी,सतीश पोरतेट, विनोद मडावी,नदीम सय्यद,मिलिंद अलोने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close