शालेय विद्यार्थी अन् पालकांना अख्ख रात्र काढावी लागली बस आगारात…!
कंकडालवार धावले विद्यार्थी अन् पालकांच्या मदतीला...!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील जिमलगट्टा, ताटीगुडम परिसरातील विध्यार्थी बाहेर गावी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांना पोळा सणानिमित्त सुट्या असल्याने पालकांनी आपल्या मुलांना गावी घेऊन जात असताना गावांकडे जाणारी शेवटची बस अहेरी बस स्थानकातून सुटल्याने आणि गावाकडे जायला दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्याने परिणामी शालेय विद्यार्थी व पालकांना बस आगारातच रात्र काढावी लागल्याची घटना समोर आली आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळीच काँग्रेसनेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी कंकडालवार बस आगारात जाऊन पालक व विद्यार्थ्यांना नाश्ता v चहाची सोय करून त्यांना स्वगावी जाण्यासाठी आर्थिक मदत केली.यावेळी शालेय विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त करीत कंकडालवार यांचे आभार मानले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,योगेश मडावी,नरेश मडावी,कारे मडावी,निर्जला मळावी,अनुजा मडावी,अजय मडावी,मोनिका गावडे,विजय गावडे,डिंपल मडावी,रजिता मडावी,संजय तलांडेसह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.