एटापल्ली तालुकासामाजिक

चंदनवेली येथील नागरिकांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला जनसंवाद !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…एटापल्ली तालुका…

माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला एटापल्ली तालुक्यातील नागरिकांची वाढता पाठिंबा

एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या चंदनवेली येथील नागरिकांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी शेकडो नागरिकांसोबत जनसंवाद साधत त्यांच्या व गावातील मुख्य समस्या जाणून घेतल्या.यावेळी चंदनवेलीसह परिसरातील शेकडो नागरिकांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्यासमोर परिसरात मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे प्रलंबित असलेल्या आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक गंभीर समस्या त्यांच्यापुढे मांडल्या.चंदनवेली या गावातील समस्यांवर बोलतांना माजी आत्राम यांनी म्हणाले, नागरिकांनी मांडलेल्या समस्यावर आपण जातीने लक्ष देऊन सोडवणुकीसाठी शर्थीचे प्रयत्न करु आणि चंदनवेली या गावाला विकासाच्या प्रवाहात जोडण्यासाठी सरकारकडे आपण प्रत्यक्ष पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी उपस्थित नागरिकाना आश्वासन दिली.


हळूहळू का होईना पण माजी आमदार आत्राम यांच्या जनसंवादाने एटापल्ली तालुक्यातील समस्याग्रस्त अनेक गावातील समस्या मार्गी लागत असल्याने या भागातील अनेक गावातील नागरिकांनी माजी आमदार आत्राम यांच्या कामाप्रती समाधान व्यक्त करीत आहे.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला चंदनवेली गावातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार आत्राम यांचेसोबत आविस सल्लागार व माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी,माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी सरपंच विजय कुसनाके,माजी सरपंच दिलीप गंजीवार,संदीप बडगे,ग्राम पंचायत सदस्य अजय मडावी, रमेश वेलादी,बल्लू शिडाम,प्रकाश कोठारे,नानाजी वैरागडे,गुरुदास इष्टाम,चयचंद्र भांडेकर,बळवंत तलांडे,वच्छलाबाई भांडेकर,धर्ती वैरागडे,विमलबाई वैरागडे,बरीकराव सडमेक,सूर्यप्रकाश चांदेकर,आदि मान्यवरांसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close