विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….प्रतिनिधी…
बामणी(बल्लारपूर)….. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतेय. वातावरणात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे उष्णतेत वाढ होत आहे तसेच पावसाचे प्रमाण देखील कमी झालेले आहे. त्यामुळे पर्यावरण हा एक सामाजिक विषय बनतोय.आता समाजाला पर्यावरणाचे महत्त्व कळायला लागले आहे. शासनाने ही ‘एक पेड मा के नाम’ ही योजना,उपक्रम चालविला आहे. समाजाप्रती आपले काही दायित्व असते त्याचा धागा पकडून बामणी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन बरडे यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री रमा शरदराव बरडे यांच्या तेरवी कार्यक्रमासोबतच वृक्षारोपणाचा कार्यक्रमही राबविला.
वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. बामणी ग्रामपंचायत परिसरात व सार्वजनिक मोकळ्या भूखंडात वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम पार पाडला. यावेळी वृक्षारोपण ही सामाजिक चळवळ व्हावी असे विनायकराव साळवे गुरुजी यांनी आपले मत व्यक्त केले. वृक्षारोपण कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक विनायक साळवे सर, दादाजी देरकर, ऍड सचिन देरकर, राजेश बट्टे, गुणवंत साळवे, सुरज डुकरे, संजय मंथनवार, मधुकर टेकाम, सुधीर ठाकरे, मनीष वांढरे, सुनील चापले, गणेश गेडाम, कपिल वरारकर, नंदकिशोर साळवे, सचिन नगराळे, शरद सोयाम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सचिन बरडे,अभिलाषा मैंदळकर, सुजाता बरडे, मोहन बरडे, कल्पना कथडे, मनीषा कथडे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.