एकरा (बु)येथे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….एटापल्ली तालुका
📝 एटापल्ली:- तालुक्यातील तोडसा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या एकरा (बु) येथे आंगनवाड़ी केंद्र 11.28 लक्ष ,एकरा (बूज) येथे 1 वर्गखोली बांधकाम 14 लक्ष रूपयाचे मौजा एकरा (बु) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे आवार भिंतीचे भूमिपूजन 5 लक्ष रुपये, एकरा (बु) सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन 5 लक्ष रुपये असे कामे मंजूर करण्यात आले होते.या सर्व जनहीताच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन नुकताच माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आला .
एकरा (बु)येथील विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांचे सोबत नंदूभाऊ मटामी तालुका अध्यक्ष आविस/ ग्रामसभा, आविस सचिव प्रज्वल नागुलवार , माजी प, स,सदस्या संगीता सुरेश दुर्वा, माजी पं. स.मंगेश हालामी, बाजार समिती संचालक रमेश वैरागडे, ग्रा प सदस्या मुन्नी ताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े, सुरेश दुर्वा, कन्ना नरोटी, सुधाकर नरोटी, रावजी, नाणेश दुर्वा, बाबूराव हलामी, अमित येनप्रेड्डीवार, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अजय गावड़े पुलिस पाटील उड़ेरा, रघुनाथ तलांडे, कैलास उसेंडी सरपंच, आकाश उसेंडी, दीपंकर भक्त, दुलसा गावड़े व गावातील नागरीक उपस्तीत होते.