बारसेवाडा येथील अपंग मुलीला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून अर्थसहाय्य !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …,एटापल्ली….
एटापल्ली....तालुक्यातील बारसेवाडा अपंग मुली अर्चना बिरजा तेलामी ला वैद्यकीय उपचारासाठी आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी आर्थिक सहाय्य दिली. माजी आमदार आत्राम हे बारसेवाडा या गावी जनसंवादाला गेले असता त्यांचे निकटचे कार्यकर्त्यांनी गावातील एक अपंग मुली आर्थिक विवंचनेत सापडल्याची माहिती त्यांना दिली.यावेळी माजी आमदार आत्राम यांनी ग्रामस्थांसोबत आपल्या जनसंवाद आटोपल्यानंतर एका क्षणाचेही विलंब न करता अपंग मुलीचे घर गाठून तीची आस्थेने विचारपूस करून आर्थिक सहाय्य करून सरकारचे अपंगांसाठी असलेल्या योजनांचे लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. बारसेवाडा येथील अपंग मुलीला आर्थिक मदत करतांना माजी आमदार दिपक आत्राम यांचे समवेत माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, पोलीस पाटील लालूजी मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी, तुळशीराम हलामी, श्यामराव मडावी,विलास तिम्मा, देवानंद पुंगाटी, सावित्री आतलामी, ताराबाई तिम्मा सरिता वाचामी, वैशाली पुंगाटी, तेजराव पोई,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार, माजी पंचायत समिती सदस्य रमेश तोरे,माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे,सुरेंद्र वैरागडे,तुषार वैरागडे,अजित कुलयेटी, किरण भांडेकर,गणेश मडावी आदी उपस्थित होते.