तांबळा येथील नागरिकांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला संवाद !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….एटापल्ली तालुका
एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या गाव म्हणून ओळख असलेल्या तांबळा येथील नागरिकांसोबत आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी संवाद साधत त्यांच्या गावातील मुख्य समस्या जाणून घेतल्या.यावेळी तांबळा सह परिसरातील हजारो नागरिकांनी संवादाला उपस्थित राहून माजी आमदार दिपक आत्राम यांच्यापुढे प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक समस्या मांडल्या असता माजी आमदार आत्राम यांनी तांबळा व परिसरातील गावांमधील समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू व समस्यांची निराकरणासाठी वेळप्रसंगी सरकारकडे पाठपुरावा करू,असे आश्वासन दिले. माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या संवादाला तांबळा येथील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,उपसरपंच दसरू मट्टामी,देऊजी मट्टामी, बंडू दुर्वा,लालसू लेकामी, धर्मा मट्टामी, लालू लेकामी,पोलीस पाटील चमरूजी दुर्वा,वसंत हिचामी, पुनाजी गावडे,विलास तिम्मा,देवानंद पुंगाटी, मधुकर मडावी, गाव भूमिया सम्माजी मडावी, डॉ.ब्रह्मनंद पुंगाटी, मधुकर मडावी,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,माजी प.स.सदस्य रमेश तोरे,माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे,सुरेंद्र वैरागडे, तुषार वैरागडे, अजित कुलयेटी, किरण भांडेकर,गणेश मडावी,सूर्यप्रकाश चांदेकर मान्यवरांसह संवादाला गावकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.