एटापल्ली तालुकाराजकीय वृत्त

एटापल्ली तालुक्यातील विविध पक्षाचे अनेक तरुण कार्यकर्त्यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क ….

एटापल्ली : महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॅा.नामदेव किरसान  पहिल्यांदाच गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रा करिता उमेदवारी देण्यात आली .डॉ.किरसान हे अभ्यासू आणि उच्चशिक्षित उमेदवार अशी त्यांची प्रतिमा असून गेल्यासहा वर्षापासून त्यांनी सातत्याने मतदार संघात ठेवलेला जनसंपर्क या त्यांच्या जमेची बाजू आहेत.

डॅा.नामदेव किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्ह्यात प्रत्येक तालुका आणि गावागावात प्रचार करत आहे.त्या संदर्भात आज एटापल्ली तालुक्यातील ताडपल्ली येथील काँग्रेस तर्फे जाहीर सभा आयोजित केली आहे.जाहीर सभेत समस्त नागरिक सहभागी घेतली आहे.

जाहीर सभेत येथील परिसरातील भाजपा – राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षातील नाराजीमुळे त्यांच्या पक्षाला राम राम करत आविसं काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांच्यावार विश्वास ठेवून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात पक्षा प्रवेश केली आहे.नवनिर्वाचित पदाधिकारी कार्यकर्तांच्या शाल व दुप्पटा टाकून स्वागत केले आहे.

त्यावेळी काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांनी येथील नागरिकांना सांगितले की’एप्रिल 19 तारीखेला आपण सर्वांनी काँग्रेसच्या पंजा चिन्हा समोरील बटण दाबून डॉ.नामदेव किरसान साहेबांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी सांगितले आहे.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी, एटापल्ली काँग्रेस तालुका अध्यक्ष रमेश गंप्पावार,गेदा ग्रामपंचायतचे सरपंच रमेश वैरागाडे,सोमजी गावडे,ललास दीचामी,रघु रामपाजी,धर्मा,संतोष कोरसामी,मधुकर कंगली,नामदेव कंगली,कपिल,देवाजी कंगली,बाबुराव,मधुकर कंगली,शिवाजी कतेला,नामदेव कंगली,वीज नरोटे,बडू गोट्टा,टीमा मडावी,शिवाजी कंगली,धर्मा मट्टामी,बाबुराव,संदीप नरोटे,मद्दी नरोटे,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,बुधाजी सिडाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागाचे प्रदेश संघटक सचिव,अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,प्रमोद गोडसेलवार,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close