मलमपल्ली येथे स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयाकडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराचे आयोजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी:मल्लमपल्ली येथे स्व.श्री मल्लाजी आत्राम बहुउद्धेशिय संस्था आलापल्ली द्वारा संचालित स्व.लक्ष्मीबाई कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयात, आलापल्ली कडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे मल्लमपल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थीनी मार्फत ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्या विषयी जनजागृती करण्यात येणार आहे. या शिबिराला उदघाटक म्हणून स्व.श्री.मल्लाजी आत्राम बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम हे होते तर विशेष अतिथी म्हणून संस्थेचे सचिव तथा माजी जि.प.सदस्या अनिताताई आत्राम उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नागेपल्ली सरपंच लक्ष्मण कोडापे,नागेपल्ली उपसरपंच रमेश शांगोंडावार, ग्राप सदस्य मल्लरेड्डी येमनुरवार,ग्राप सदस्य आशिष पाटील,माजी सरपंच दिवाकर मडावी,माजी सरपंच विजय कुसनाके,प्रा.गर्गम सर,प्रा.कोहपरे सर,प्रा.रायकुंडलिया सर,विनोद कावेरी,सुधाकर कोरेत,जुलेख शेख,आविस सल्लागार विशाल रापेल्लीवर उपस्थित होते. विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. पारखी मॅडम,प्रा.चिलुवेरु मॅडम,प्रा चेड़े मॅडम,प्रा दुर्गे मॅडम,प्रा.पडीशालवार मॅडम,अनुराग तुंडूलवार,अखिल झाडे यांनी परिश्रम घेतले.या शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थिनी व गावातील नागरिक उपस्थित होते.