Gamesअहेरी तालुका

आरेंदा येथील क्रिकेट सामन्याचे व मुलींचे कबड्डी सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝अहेरी तालुक्यातील आरेंदा येथे जय हनुमान युवा क्रीडा मंडळ यांच्या वतीने भव्य टेनिस बॅल क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे सदर स्पर्धेसाठी पहिला दुसरा व तिसरा विजेता संघांना देण्यात येत आहे. या स्पर्धेचे उदघाटन लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाला.

माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी उद्धघाटनिय भाषणात म्हंटले की युवक देशाचे आधारस्थंभ आहेत युवकांनी सामाजिक, शैक्षणिक क्रीडासह प्रत्येक क्षेत्रात अग्रनी राहून विकास व प्रगतीचा धुरा सांभाळल्यास निश्चितच गाव तालुका जिल्ह्याचं नावं कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. युवक देशाचे आधारस्थंभ असून युवकांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असल्याची ग्वीही लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दिले.

यावेळी उपस्थित सौ.किरणताई नैताम सरपंच, ग्रामपंचायत पेरमेली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच पेरमेलि, निलेश वेलादी सरपंच ग्रा.पं मेडपली, प्रशांत गोडशेलवार नगर सेवक न.पं.अहेरी,साजन गावडे, अशिफ खान पठाण पत्रकार , मंडळाचे अध्यक्ष करणं आत्राम, उपाध्यक्ष बीचु वेळादी,सचिव डोलेश आत्राम,इरपा आत्राम,पोच्या तलांडे,नामदेव दहागावकर, कोता आत्राम गाव पाटील,पेंटाजी आत्राम,मासा आत्राम कवीश्वर चंडनखेडे, सुभाष दहागावकर,साजन गावडे, मोहन वेलादी,कैलास झाडे,नरेंद्र गर्गम,गीलाजी गावडे,राकेश सडमेकसह गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close