चामोर्शी बाजार समितीचे नवनियुक्त सभापती व उपसभापतींच्या सत्कार …!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार हे आज गडचिरोली दौऱ्यावार असताना त्यांनी चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती अतुलभाऊ गण्यारपावर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्बेतीचे आस्थेने विचारपूस करून त्यांची चामोर्शी येथील बाजार समितीचे सभापती पदी निवड झाल्याबद्दल आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी अतुलभाऊ गण्यारपावर व उपसभापती प्रेमानंद मलिक यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करून पुढील वाटचालीस दोघांना शुभेच्छा दिले. यावेळी बाजार समितीचे संचालक मंडळी व कर्मचारीवर्ग उपस्थित होते.