माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून वीज पडून मृत्यू पावलेल्या रामटेके कुटुंबियांची सांत्वन व आर्थिक मदत ..!
अहेरी : तालुक्यातील महागाव बुज येथील दुदैव घटना घडले आहे.महागांव बु येथील शेतकरी लक्ष्मण नानाजी रामटेके यांनी शेती कामानिमित्त काल भर पाऊसात शेतीच्या कामाकरिता शेती कडे गेले होते.अहेरी परिसरात ढगाळ हवामान असल्याने पावसाची दाट शक्यता होती.सकाळी अचानक वातावरणात बद्दल होऊन महागांव बुज सह आदि गावा मध्ये मुसळदार पाऊस सुरु झाल्याने. शेती कामाकरिता घेलेल्या लक्ष्मण रामटेक यांचवर वज्रदात विज कोसळली असल्याने गावात एकच धांदल उडाली.महागांव बुज येथील पाऊस सुरु होताच शेतीचे कामा करण्यासाठी शेतकरी लक्ष्मण रामटेके यांनी बांधावर घेले होते.याचवेळी अंगावर वीज पडून जागीच मूत्यू झाले.घटनेची माहिती गावातील नागरिक तसेच कार्यकर्त्यांकडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती देताच वेळेची विलंब ना करतात महागांव बुज येथील त्यांचे निवासस्थानी जाऊन कुटुंबियांना आस्तेने विचारपूस करून पुढील कार्यक्रमाला आर्थिक मदत करण्यात आली.तसेच शासनाकडून मिळणारी अर्थसाहाय्य लवकरात लवकर देण्यात यावी असे तहसीलदार साहेबांना विनंती केले.
यावेळी अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,राजेश दुर्गे ग्रामपंचायत सदस्य,प्रमोद रामटेके,संजय अलोने,चंद्राजी रामटेके,समय्या येर्रावार,स्वामी आत्राम,वंदना दुर्गे,सोनू गर्गम,विजय अलोने,मारूती कारमे,भीमा चौदरी,पुरुषोत्तम गर्गम,प्रमोद गोडसेलवारसह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.