सिरोंचा येथे दर्पणकार,आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित पत्रकार दिन थाटात संपन्न…!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी…
सिरोंचा येथे मराठी वृत्तपत्राचे जनक,दर्पणकार, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आलं होता. या पत्रकार दिन कार्यक्रमाला तालुका डिजीटल मीडिया, प्रिंट मीडियाचे पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून साजरा करण्यात आली.
मराठी पत्रकारितेची जनक , दर्पणकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आली आहे. तसेच
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक समाधान चव्हाण यांची उपस्थिती होते,
त्यावेळी तालुका पत्रकार संघटनेच्या तालुका उपाध्यक्ष – सागर भाऊ मूलकला, सचिव – अशोक कुम्मरी, कोषाध्यक्ष – विनोद नायडू, सदस्य – रवी सल्लम, साईनाथ दुर्गम,सुधाकर सिडाम, उज्वल तिवारी, रवी बारसागडी, रवीकुमार येमुर्ला, रवी सुलतान, आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.