सिरोंचा येथे पत्रकार दिनानिमित्य भाजप कडून पत्रकारांचे सत्कार…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…. प्रतिनिधी…
सिरोंचा…… सिरोंचा पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी दर्पण वृत्त पत्रिकाचे पितामह तथा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आलं होता. सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेच्या मार्फत इंदिरा गांधी चौकात पत्रकार संघटनेचे अध्यक्ष श्याम बेज्जनवार यांच्या नेतृत्वाखाली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आली.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून भाजप तालुका अध्यक्ष शंकर नरहरी यांनी सिरोंचा शहर व ग्रामीण भागातील डिजिटल व प्रिंट मीडियाचे पत्रकारांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता.
यावेळी श्याम बेज्ज्नवार, सागरभाऊ मूलकला उपाध्यक्ष अशोक कुम्मरी सचिव, विनोद के नायडू कोषाध्याक्ष,रविभाऊ सल्लम संपादक तथा माजी अध्यक्ष पत्रकार संघटक जलिल पाशा संपादक ला,रवि बारसागडी, रवि येमुर्ला सद्स्य तथा सुधाकर सद्स्य मुरलीधर मारगोनी सदस्य साईनाथ दुर्गम सुधाकर शिडमसह डिजिटल,प्रिंट मीडिया, सोशल मीडियाचे पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.