सिरोंचा येथे पोलीस विभागाकडून शालेय विद्यार्थ्यांचे रस्ता सुरक्षा व स्वच्छता रॅली…!
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क…. प्रतिनिधी
सिरोंचा… काल दिं.06/01/2025 रोजी महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रोजेक्ट उड्डाण अंतर्गत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल सा. मा. यतीश देशमुख सा. (अप्पर पोलीस अधीक्षक अभियान )मा. एम. रमेश सा. (अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन )मा. श्रेनीक लोढा सा. (अप्पर पोलीस अधीक्षक प्राणहिता )यांच्या संकल्पनेतून व मा. संदेश नाईक सा. उपाविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस स्टेशन सिरोंचाचे प्रभारी अधिकारी श्री समाधान चव्हाण सा.यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिरोचा येथे रेझिंग डे सप्ताह दरम्यान पोलीस स्टेशन सिरोंचा येथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सिरोंचा , कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सिरोंचा येथील विद्यार्थ्यांना बोलावून सिरोंचा शहरातून महिला सुरक्षा , रस्ता सुरक्षा, व्यसनमुक्ती व स्वच्छता रॅली काढून विविध घोषणा ,फलक बॅनर च्या माध्यमातून नागरिकांना महिला सुरक्षा ,रस्ता सुरक्षा, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.
तसेच पोलीस स्टेशन येथे शस्त्र प्रदर्शन दाखवण्यात आले, त्यात विविध शस्त्राविषयी, सायबर गुन्ह्यांविषयी व पोलीस स्टेशनच्या कामकाजा बाबत सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये 600 ते 700 विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांसह भाग घेतला होता. त्यांना चहा, बिस्किट व चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.