पोलीस भरतीसाठी 2 वर्ष अधिक वयोमर्यादा वाढविण्याची मागणी..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा – गडचिरोली पोलीस भरती साठी तयारी करणाऱ्या युवकांनी सिरोंचाचे तहसीलदारामार्फत गडचिरोली चे जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून पोलीस भरतीसाठी 2 वर्ष अधिकचे वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी केली आहे, सुशिक्षित
युवकांनी निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त ,अती दुर्गम भाग म्हणून ओळखले जाते,
शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी युवक व युवतींना वयोमर्यादा 33 वर्षे ठेवण्यात आली आहे, मात्र मागील
दोन वर्षे कोरोना संकटामुळे पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात आली नव्हती.
अशातच या वर्षीपासून शासनाने गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे,
शासनाने परिपत्रक नुसार पोलीस भरती प्रक्रियेत पोलीस भरती देणाऱ्याच्या वयोमर्यादा 33 वर्षे असावे असे आदेश देण्यात आली आहे,
गडचिरोली जिल्हाकरिता पोलीस भरती प्रक्रियेत वयोमर्यादा 33 वर्षे जागी 35 वर्षे करण्यात आल्यास याची जिल्हातील सुशिक्षित युवक/ युवतीना याची फायदा होईल म्हणून सिरोंचा तालुक्यातील युवकांनी सिरोंचा तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून मागणी केली आहे,
यावेळी सिरोंचा तालुक्यातील सुशिक्षित युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,