यशस्वी विद्यार्थी घडविण्यामागे वाचनालय हे महत्वाचे केंद्रबिंदू ठरू शकतात !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
पेरमिली येथे वाचनालय इमारतीचे भूमिपूजन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी माजी जि.प.अध्यक्षअजयभाऊ कंकडालवार मार्गदर्शन पर बोलत असतांना म्हणाले की,पेरमिली हे गाव अतिदुर्गम नक्षलग्रस्त भाग असून विध्यार्थ्यांना अभ्यास करण्या साठी बसण्या योग्य जागा उपलब्ध नाही. विध्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी वाचनालय केंद्रबिंदू बनू शकते व काही वर्षा अगोदर पेरमल्ली येथील गावकऱ्यांनी माझाकडे वाचनालयाची मागणी केले होते,गावकऱ्यांच्या मागणी नुसार त्यांच्या शब्दाना मान ठेऊन इथे वाचनालय मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी अध्यक्ष असताना त्यांनी या कामाला मंजुरी मिळवून दिली व आज त्याकामाचा भूमिपूजन संपन्न झाला.
यावेळी उपस्थित किरणताई नैताम सरपंच,ग्राम पंचायत पेरमेली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच, निलेश वेलादी ग्राम पंचायत सरपंच मेडपल्ली, प्रशांत गोडशेलवार नगरसेवक न. प अहेरी, साजन गावडे, अशिफ खान पठाण पत्रकार ,कवीश्वर चंडनखेडे,कैलास झाडे, मोहन वेलादी, सुभाष दहागावकर, शंकर कुंभारे ,देविदास दहागावकर,मेश्राम मामा, मनहोर गर्गम, श्रीकांत दुर्गे, बंडू दहागावकर, श्याम दहागावकर, अविनाश कोंडगुर्ले, उमेश चांदेकर, महेश चांदेकर, सुरेखा दुर्गे, सुमन दहागावकर, गिरजा दुर्गे, ललिता चांदेकर, निर्मला दहागावकर, लक्ष्मी कुंभारे, लतिका दहागावकर, तुकेश कुंभारे, संदीप दुर्गे, तेजस चांदेकर,बाल्या दुर्गे,नरेंद्र गर्गम, राकेश सडमेकसह व गावातील नागरीक उपस्थित होते.