अहेरी ते महागाव व सुभाषनगर या मुख्य रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची नव्याने डांबरीकरण करण्याची मागणी…!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील महागांव ते सुभाषनगर या रस्तावर काही महिन्यांपूर्वी पासून मोठ – मोठे खड्डे पडून आहे.या रस्त्यावरून येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना व प्रवाश्यांना खड्डेमूळे नाहक त्रास सहन करावे लागत आहे.अहेरी – महागांव – सुभाषनगर या मुख्य मार्गावरून दररोज रुग्णालय आणि शालेय विध्यार्थी व गर्भावती महिलां या रस्त्याचा वापर करीत असून जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे.त्याकरिता सदर रस्त्याची समस्यांची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी लक्ष घालून येत्या सात दिवसाचे आत या रस्त्याचे कामाला सुरू करण्याची मागणी आविसं व जि.प.चे माजी अध्यक्ष व बाजार समितीचे सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.
जर येत्या 7 दिवसात आत या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करावे तसेच खड्डे बुजवावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी भ्रमणध्वनीवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता याना दिला आहे.