अहेरी तालुका

नंदीगाव येथील युवकांनी घेतली जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची भेट..!

विदर्भक्रांती

अहेरी : तालुक्यातील देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नंदिगांव येथील युवकांनी आज आविसं -व काँग्रेसचे युवा नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांची अहेरी येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात भेट घेतली.भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कांकडालवार यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व निरोगी आयुष्यासाठी मनोकामना व्यक्त केली.यावेळेस नंदीगाव येथील युवकांनी सुद्धा कंकडालवार यांना सुद्धा नूतनवर्षाचे शुभेच्छा देऊन पुढील राजकीय वाटचालीस सुद्धा शुभेच्छा दिले.

यावेळी अजयभाऊ कांकडालवार यांच्या समोर उपस्थित युवकांनी गावातील भिन्न भिन्न समस्या त्यांच्यासमोर मांडले असता यावर कांकडाळवर यांनी समस्या सोडवणुकीचे आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित युवकांनी जिल्हा परिषद,विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाऊ सांगितलेलं उमेदवाराला मदत करण्याचे कंकडालवार यांना शब्द दिले.

यावेळी हरिश गावडे उपसरपंच ग्रामपंचायत देवलमरी,संदिप दुर्गे,अविनाश गलबले,नागेश सिडाम,राहुल आलाम,आनंदराव सिडाम,प्रकाश मडावी,किशोर आलाम,स्वप्निल तोर्रेम,प्रभाकर मडावी,प्रकाश कुमरम,श्रीकांत आलाम,सुनिल सिडाम,रोहीत आलाम,खुशाल गेडाम,श्रावन मडावी,अरविंद सोयामसह आविसं व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close