अहेरी तालुक्यातील नवेगाव येथील कबड्डी सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन …!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆अहेरी◆:तालुक्यातील नवेगाव येथे जगदंब क्रीडा मंडळाकडून आयोजित भव्य खुले कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला. या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून वेलगूर ग्रामपंचायत चे सरपंच किशोर आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून वेलगूर ग्रामपंचायत चे उपसरपंच उमेश मोहुले॔,ग्रा.प.सदस्य रोहित गलबले,बंडूजी नागोसे,साईनाथ नागोसे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती मोहूले॔,महेश रेषे,किष्टापूर गावचे पोलिस पाटील महेशजी अर्का,हरिदास आत्राम,संजयजी सडमेक महाराज वेलगूर टोला, जुलेख शेख,तुळशीराम गुरनुले, लक्ष्मण झोडे,गंगाराम लोनबले, मल्लेश निकोडे,फकिरा निकूरे, रमेश शेंडे,मोतीरामजी मोहुले॔, जगदिश सडमेक,पत्रुजी कोडापे,विनोद कावेरी,प्रवीण रेषे,तुकाराम झोडे, भगवान आत्राम,अरविंद कंन्नाके,शिवराम मोहूर्ले,भारत शेंडे,विलास शेंडे सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले. कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम व सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले. जगदंब क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रेषे सर यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला नवेगाव,बाळापूर सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी मारोती मोहूर्ले,विवेक मंडल,प्रवीण रेषे,विशाल महांडोरे,रोहित मोहूर्ले,विराट मोहूर्ले,सुनील झोडे,शंकर वाढई,प्रतीक गाऊत्रे,अश्विन निकिडे यांनी परिश्रम घेतले.