अहेरी तालुकाराजकिय

अहेरी येथे काँग्रेस पक्षाचे बूथ कमिटी पदाधिकाऱ्यांचे मेळावा संपन्न..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

गडचिरोली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील भामरागड व अहेरी येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी मेळावा कार्यक्रम संपन्न झाली .या मेळाव्याला विधानसभा क्षेत्रतील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी लोकसभा व विधानसभा निवडूक जिंकून काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात एकहाती सत्ता आणण्यायाकरिता अहेरी तालुका काँग्रेस कमिटी बूथ पदाधिकारी यांचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आला.यावेळी सर्व कार्यकर्त्यानी एक दिलाने काम करण्याची  सूचना आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित कार्यकर्ते व  पदाधिकाऱ्यांना दिले.

या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी,माजी आमदार पेंटारामजी तलांडी,प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते,जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडलावार,महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ.चंदाताई कोडवते,महिला काँग्रेस अध्यक्ष कविताताई मोहरकर,काँग्रेस नेते हसनलभाई गिलानी,नगरपंचायत अध्यक्ष रोजा करपेत अनु.जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे,आदिवासी सेल अध्यक्ष हनुमंत मडावी,परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले,अहेरी तालुकाध्यक्ष डॉ.अब्दुल (पप्पू) हकीम,सगुणाताई तलांडी,मुस्ताक हकीम,निताताई तलांडी,अशोक येलमुले,रज्जाक पठाण,बबलू शडमेक,अजय नैताम,माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरपंचायत नगरसेवक प्रशांतगोडसेलवार,अरुण बेज्जलवार,प्रमोद आत्राम,सुनीता कुसनाके,भास्कर तलाडे,स्वप्नील मडावी,सचिन पंचार्यसह स्थानिक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close