जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते मदनम पोचम्मा मंदिर बांधकामाचे भूमिपूजन..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मुलचेरा : तालुक्यातील येल्ला येथील मदनम पोचम्मा मंदिर बांधकामाचे भूमिपूजन आज काँग्रेसचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.
माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यापूर्वी मुलचेरा तालुक्यातील येल्ला या गावाला भेट दिले होते.या भेटीत या येथील ग्रामस्थांनी गावात मदनम पोचम्मा मंदिर नसल्याने पूजा -अर्चना कार्यांना अडचण होत असल्याची अजयभाऊ कंकडालवार यांना सांगितले होते.येल्ला येथील ग्रामस्थांची धार्मिक भावना लक्षात घेऊन कंकडालवार यांनी गावात स्व:खर्चाने पोचम्मा मंदिर बांधून देण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
येल्ला येथील ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनानुसार अजयभाऊ कंकडालवार यांनी आज मदनम पोचम्मा मंदिर बांधकामाचे भूमिपूजन केले.यावेळी येथील ग्रामस्थांकडून काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार व काँग्रेस पक्षाचे आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष हनुमंतू मडावी यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.दिलेल्या शब्द पाळल्याबद्दल कंकडालवार यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
या भूमिपूजन सोहळ्याला गावकरी व काँग्रेस,आविसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.