सिरोंचा येथे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ.किरसान यांचा प्रचार कार्यालयाचे उदघाटन…!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…..
सिरोंचा : काँग्रेस इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डाॅ.नामदेवराव किरसान यांचा विजयासाठी काँग्रेस इंडिया महाविकास आघाडी मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यानी कामाला लागले आहेत.काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.किरसान यांना लीड मिळवून देण्यासाठी ठिकठिकाणी प्रचार दौरे करत आहे.
काल सिरोंचा येथे आघाडीचे उमेदवार डॉ. किरसान यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन करण्यात आला.या प्रचार कार्यालयाचे उदघाटन काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी काँग्रेस नेते अजयभाऊ कंकडालवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना भविष्यात काँग्रेस पार्टी व आघाडी सत्तेत आल्यास आपल गाव आणि संपूर्ण जिल्हाचे विकास होऊ शकते. म्हणून पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आपआपल्या गावातील प्रत्येक मतदारांना सांगून आघाडीचे उमेदवाराला मतदान करण्यासाठी प्रचार करण्यात यावी.आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यानी एकत्रित येऊन प्रचार करण्याची सूचना दिले.
कार्यालय उदघाटन प्रसंगी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी,काँग्रेसनेते बानय्या जनगाम,सिरोंचा तालुका अध्यक्ष सतीश जवाजी,महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नीताताई तलांडी,माजी सभापती सुरेखाताई आलम,माजी सभापती भास्कर तलांडे,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे उपसरपंच तिरुपती दुर्गम,माजी सभापती सुगणाताई तलांडे,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तालुका अध्यक्ष फाझील पाशा,उपाध्यक्ष सागर मूलकाला,सिरोंचा बाजार समिती संचालक मल्लिकार्जुन आकुला,जाफ्राबाद ग्रामपंचायतचे सरपंच कुळमेथे साहेब,महिला काँग्रेस अध्यक्ष शेख दीदी,नगरपंचायत माजी नागराध्यक्ष मारिया दीदी,सिरोंचा बाजार समिती संचालक नागराजू इंगली,सरपंच अजय आत्राम,सरपंच सुरज गावडे,सरपंच रमेश तैनेनी,सरपंच सिजाता येलम,मरपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला,अजयभाऊ सोशल मीडिया समन्वयक संपत गोगूला,श्रीनिवास दुर्गम,लक्ष्मण बोल्ले,गणेश राच्चर्लावर,विजय तोकाला, महेश तलांडे,सागर कोट्टारी,आनंद आशा,माजिद ली,सचिन पंचार्य,राकेश सडमेक सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.