पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पाचही गावांमध्ये स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी..!

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा :- सिरोंचा पंचायत समिती हद्दीतील येणारी ग्राम पंचायत पेंटीपाका अंतर्गत पेंटीपाका, लंबडपल्ली, मुगापूर, मुदुकृष्णापूर , माणिक्यापूर या पाच गावांचा समावेश असून या पाचही गावांमध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा देवी नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे.या पाचही गावांमध्ये शारदा, दुर्गा नवरात्र सह बतकम्मा उत्सवही नऊ दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असतात. परंतु पाचही गावांतील अनेक सार्वजनिक खांबावर स्ट्रीट लाईट बंद असून यामुळे सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरलेलं आहे.
या गंभीर विषयावर ग्राम पंचायत प्रशासनाने लक्ष देऊन नवरात्र व बतकम्मा उत्सव अंधारात साजरा होऊ नये याची काळजी घेत ग्राम पंचायत हद्दीतील येणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये सार्वजनिक खांबावरस्ट्रीट लाईट लावण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते सागर मुलकाला यांनी केली आहे.