नोकरी संदर्भ

गडचिरोली येथे 20 सप्टें.ला पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… गडचिरोली…

गडचिरोली,(जिमाका)दि.14: जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक ‍ प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीयांच्या संयुक्त विद्यमाने दि.20 सप्टेंबर2022 रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, गडचिरोलीयेथे रोजगार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये डिस्टील एज्युकेशन & टेक्नॉलाजी प्रा.लि.नागपूर ही कंपनी व इतर कंपन्या उपस्थित असणारअसून‍ सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दिनांक 20 सप्टेंबर2022 रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, आयटीआय चौक, चंद्रपूर रोड गडचिरोली येथे उपस्थित राहुन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली यांनी केले आहे.अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली,दुरध्वनी क्रं.07132-222368 यावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close