गट्टा येथील नागरिकांसोबत माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी साधला संवाद !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क…एटापल्ली तालुका
*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवादाला नागरिकांची प्रचंड प्रतिसाद*
एटापल्ली…तालुक्यातील अतिदुर्गम ,नक्षलग्रस्त व मागासलेल्या गट्टा येथील नागरिकांसोबत आविसंचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी जनसंवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेतल्या.यावेळी गट्टा व परिसरातील नागरिकांनी माजी आमदार दिपक आत्राम यांच्यासमोर परिसरातील भेडसावत असलेल्या आरोग्य,सिंचन,रस्ते,वनहक्के दावे,शिक्षण,रोजगार असे अनेक ज्वलंत समस्या मांडल्या असता या समस्यांवर बोलतांना माजी आत्राम यांनी म्हणाले, मागील आठवड्यात आपण जांबिया येथील नागरिकांसोबत संवाद साधून तेथील समस्या ऐकले व संबंधित अधिकाऱ्यांना सांगून हेडरी ते गट्टा रस्त्याची दुरुस्ती चे काम मंजूर झाले असून येत्या काही दिवसात कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे तसेच या भागातील विद्युत विभागाकडून वीज जोडणीचे कामाला ही सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगत गट्टा व परिसरातील नागरिकांनी मांडलेल्या समस्या वरही तोडगा काढू,आणि गट्टा सह परिसरातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी उपस्थित नागरिकाना आश्वासन दिली.
माजी आमदार आत्राम यांच्या प्रयत्नाने या भागातील समस्या मार्गी लागत असल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या जनसंवाद सभेला गट्टा व परिसरातील गावातील नागरिकांची प्रचंड प्रतिसाद मिळाले. यावेळी माजी आमदार आत्राम यांचेसोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,ग्रा.पं. सदस्य अजय मडावी, माजी सरपंच विजय कुसनाके,संदीप बडगे, पोलीस पाटील कन्नाजी गोटा, माजी सरपंच दोडगे गोटा, तानेंद्र लेकामी, महारु लेकामी,गोरगुटाचे पोलीस पाटील देवुजी हिचामी,रामू गोटा, शिवाजी गोटा, ताटीगुडमचे दिलीप आलांम, रमेश शहा,राजू आत्राम,नंदलाल किंडो, गणेश तुमरेटी,हरिप्रसाद खलको,अजय तोफा,राकेश मलीक, सह आविस पदाधिकारी व कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्तीत होते.