चंद्रपूर जिल्हासांस्कृतिक कार्यक्रम

भाऊच्या दांडियात दोन माजी खासदारांची विशेष उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क ….चंद्रपूर

बाबुजीमधील सांस्कृतिक प्रेमाचे चंद्रपूरकरांना दर्शन

माजी खासदार नरेश पुगलीया यांनी दिले ‘कपल डान्स’ ला एक लाखांचे बक्षीस

भाऊच्या दांडियात दोन माजी खासदारांची विशेष उपस्थिती

चंद्रपूर : शहरातील तरुणांसाठी आकर्षक ठरलेल्या भाऊच्या दांडियामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश बाबू पुगलीया व माजी खासदार हंसराज अहिर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी भाऊच्या दांडियाचे भव्य आयोजन व गरबा बघून भारावलेल्या नरेशबाबूंनी कपल डान्स मध्ये उत्कृष्ट ठरलेल्या आर्या कोहपरे व आदित्य राठोड या दोघांना एक लाखांचे बक्षीस देऊन गौरव केला. काँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश बाबू पुगलीया यांनी चंद्रपूरच्या सांस्कृतिक क्षेत्राला नेहमीच पाठबळ दिलेले आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. गरबा दांडियाच्या निमित्ताने बाबुजीमध्ये असलेले सांस्कृतिक प्रेम चंद्रपूरकरांना अनुभवता आले. खासदार बाळू धारनोकर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भाऊच्या दांडिया कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी देखील हजेरी लावली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी, माजी आमदार अविनाश वारजूरकर, चंद्रपूर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष देवराव भोंगाडे, माजी उपमहापौर राहुल पावडे, ऍड. देविदासजी काळे, संजय देरकर, ईजहार शेख, डॉ. महेंद्र लोढा, दिलिप मालेकर, आशिष कुलसंगे, डॉ. वासुदेव गाडेगोणे, प्रा. सुर्यकांत खनके, डॉ. प्रेरणा कोलते, आकाश साखरकर, डॉ. प्रसाद पोटदुखे, डॉ. ईश्वर कुरेकरजी, मंगल बल्की, प्रा. विजय बदखल, दिलिप हजारे, मनोज खोटे, राजु बनकर, रामदास दानव, राकेश चहारे, शैलेश इंगोले, बोहरा समाज, जनाब आमिल, शेख झाकीरभाई खुमुशी, बाळु खोब्रागडे, अरुण घोटेकर, प्रमोदराव बोरीकर, कृष्णा मसराम, जितेश कुळमेथे, विजय चंदावार, राजेश गंपावार, राजेंद्र गुंडावार, सुनिल पुराणकर, राजुभाऊ वेलंकीवार, अजुमन गौस, डॉ. मनसुर चिनी, ए.यू. खान, आसिफ शेख, निकिशा अश्रफ खान पठाण, डॉ. एम.जे. खान, मोहम्मद सिद्दीकी शेख, भोई समाज, शैलेश केळझरकर, सुभाष शिंदे, सुरेश बंडीवार, प्रमोद केळझरकर, जसबीर सिंह, धुन्ना जी, जसबीर सिंह सैनी, चरनजीत सिंह, चमकौर सिंह, बलबीर सिंह, बलदेव सिंह, गोगी गुरम, जग्तार सिंह, जगजितसिह गिल यासह अन्य मान्यवरांच्या यावेळी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, महिला काँग्रेस नेत्या चित्र डांगे, ओबीसी नेते उमाकांत धांडे, माजी नगरसेवक संतोष लहामनगे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते कुणाल चहारे, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे, सिलावार यांची उपस्थिती होती.

या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑक्टोबर २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close