चंद्रपुर जिल्हा

सुरजागड लोहप्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथे घेण्याची मागणी !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …चंद्रपूर…

*माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची चंद्रपूर येथील उपपप्रादेशिक अधिकारी व गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी*

*चंद्रपूर*.....एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोहप्रकल्पाची जनसुनावणी गडचिरोली येथे न घेता एटापल्ली येथेच घेण्याची मागणी अहेरीचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी चंद्रपूर येथील उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अतुल सातफळे व गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या गंभीर समस्यावर चर्चा करून चर्चेअंती त्यांना निवेदन देऊन वरील मागणी केली आहे. माजी आमदार आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर,वने व पर्यावरण मंत्रालय यांच्या अधिसूचना अन्वये सुरजागड माईनचे प्रस्तावित वाढीव उत्पादनाकरिता 348.09 खाण लीज क्षेत्रात लोह खनिज उत्खनन 3.0 दशलक्ष टन प्रतिवर्षं ते 10.0 दशलक्ष टन प्रतिवर्षं क्षमतेच्या प्रकल्पाच्या प्रस्तावबाबत पर्यावरण विषयक जनसुनावणी घेण्यात येत आहे. उल्लेख असलेले प्रभावित सर्व गावे दूरवरचे व अतिदुर्गम भागातील असल्यामुळे आणि तेथील रहिवासी अशिक्षित असल्यामुळे त्या सर्व बधितांना गडचिरोलीला जाणे आर्थिकदृष्ट्या झेपणार नाही,त्यामुळे बाधितांची आक्षेप असूनही नोंदविण्यापासून वंचित राहतील,त्यामुळे जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथे घेण्याची त्यांनी मागणी केली आहे. माजी आमदार आत्राम यांनी उपप्रदेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर व गडचिरोलीचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पुढे नमूद केले कि, कोरोना काळापासून एटापल्ली तालुक्यात विविध दैनिकाचे वृत्तपत्र बंद आहे व जाहिरात दिले असलेले वृत्तपत्र एटापल्ली तालुक्यात कुठेही उपलब्ध नाहीत,त्यामुळे जाहिरात दिलेले वृत्तपत्र त्या बाधित दुर्गम गावात जाते काय ?तसेच जनसुनावणीची नोटीस तालुक्यातील जनतेच्या वाचनात आली काय ?व त्यांना कळले काय़ ? असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित होत असून जाहिरात देण्यामागे प्रमाणिक हेतू आहे काय? ही केवळ औपचारिकता आहे काय ?याबद्दल सुद्धा शंका निर्माण होत असून हा विषय त्या सर्व बाधित गावांमध्ये दवंडी पिटवून माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे असे म्हंटले आहे. सुरजागड लोहप्रकल्पाचे आतापर्यंत सुरू असलेले उत्खनन व वाहतूक करतांना कोणतेही नियम पाळल्या जात असतानाचे दिसून येत नाही.मग ते पर्यावरण संबंधित असो ,वनसंवर्धन कायदा असो व वाहतुकीचे नियम असो. नक्षलवादमुळे उत्खननासाठी स्फोटके वापरायला बंदी असतांना त्रिवेणी अर्थ मूव्हर्स कंपनीला विशेष परवानगी कसे काय आहे ?जिल्ह्यात वनसंवर्धन कायद्याची अडसर असल्यामुळे शेतकऱ्यांना नदीपासून शेतापासून छोटी नाली खोदायला परवानगी नाही परंतु त्रिवेणी कंपनी अख्खे पहाड खोदून काढत आहे तिथे मात्र वनकायदा आडवा येत नाही आहे.तसेच पर्यावरण संवर्धन कायदा,वन्यजीव कायदा,मोटार व्हेईकल ऍक्ट व रस्ते सुरक्षितता कायदा याचे पुरेपूर उल्लंघन होत आहे.यासर्वाचे आम्हाला व बाधितांना अपेक्षित उत्तर हवंय असल्याने दिनांक 27/10/2022 रोजीची जनसुनावणी गडचिरोली ऐवजी एटापल्ली येथेच घेण्याची मागणी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. संबंधीत अधिकाऱ्यांना निवेदन देतांना माजी आमदार आत्राम यांचे सोबत माजी जि.प.सदस्य संजुभाऊ चरडुके,उपसरपंच श्रीकांत सम्मतदार,कमल बाला, संदीप बडगे उपस्तीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close