चंद्रपुर जिल्हा

भावसार समाजाचा हळदी कुंकू व स्नेहसंमेलन सोहळा थाटात संपन्न

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क चंद्रपूर….

भावसार समाजाचा हळदी कुंकू व स्नेहमिलन सोहळा
चंद्रपूर: येथील भावसार समाज महिला फाउंडेशन व भावसार युवा एकता महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मकर संक्रांति निमित्त भावसार समाज महिला भगिनींचा हळदीकुंकू व स्नेह मिलन सोहळा मोठ्या हर्षोल्लासात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमल अलोने, प्रमुख पाहुणे मनीषा आंबेकर, फाउंडेशनच्या अध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाषा मैंदळकर, प्रीती लखदिवे, वैशाली जोगी, पूजा बर्डे, आरती गोजे,एकता बर्डे,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्य दैवत माता हिंगलाज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व हार अर्पण करून करण्यात आले. या समयी भावसार समाजाच्या असंख्य महिला तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यात मंदिराला आकर्षक रूपाने सजविण्यात आले. महिलांनी उखाणे स्पर्धा घेतली व “महिला व मुलींच्या कौटुंबिक, वैवाहिक व सामाजिक समस्या यावर चर्चासत्र घेण्यात आले. उपस्थित सर्व भावसार भगिनींना वाण, तिळगुळ वाटप करण्यात आले शेवटी अल्पोहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगिता धनेवार संचालन अभिलाषा मैंदलकर, आभार प्रदर्शन पूजा बर्डे यांनी केले. आस्था गोजे, जयश्री गोजे, लता जोगी, संध्या मैंडळकर, प्रगती सरागे,किरण जोगी, विजया सुत्राळे, कविता पेटकर, अर्चना पेठकर पौर्णिमा दखणे, माधुरी दखणे, मीनाक्षी अलोने, अर्चना आलोने, शुभांगी गोजे, लता बर्डे आदींनी अथक परिश्रम करून कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close