राजपूर पॅच येथे क्रिकेट सामन्याचे माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …अहेरी तालुका
अहेरी:- तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या ग्रा.प.राजपूर पॅच येथे अनिल भाऊ गुरनुले यांच्या भव्य पटांगणात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते पार पडला तर उदघाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून आलापल्ली ग्राम पंचायत चे माजी सरपंच विजय कुसनाके हे होते.या क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पुरस्कार माजी आमदार दिपक आत्राम व अजयभाऊ कांकडालवार यांच्या संयुक्त विद्यमाने 51हजार रुपये रोख,तर द्वितीय पुरस्कार कंत्राटदार अशोक रागीवार व आराध्या किराणा व जनरल स्टोर ,माजी पंचायत समिती सदस्या छायाताई पोरतेट यांच्या संयुक्त 30 हजार रुपये रोख आहे.तसेच अनेक आकर्षक पुरस्कार ही ठेवन्यात आले. या उदघाटनिय सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्या सुनीता कुसनाके, माजी पं. स.सदस्या छायाताई पोरतेट, सरपंच विजय आत्राम,विशाल रापेल्लीवार,उपसरपंच उमेश मोहूर्ले, जुलेख शेख, श्रीनिवास आलम,गणेश चौधरी, कार्तिक तोगंम,संदीप बडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनीय सोहळ्याचे यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे रामुलू कुळमेथे ,नरेश आत्राम,शैलेश वेलादी,सुनील आत्राम,प्रशांत शेडमाके, राहुल आत्राम,पांडुरंग बोंमकंटीवार,अक्षय आलम, खुशाल मडावी आदींनी अथक परिश्रम घेतले. सदर सामन्याचे आयोजन आर.आर.एस.बी.प्रीमियर लीग यांच्यावतीने करण्यात आले.क्रिकेट सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला गावकरी व खेळाडु ,क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.