अहेरी तालुका
म.रा.पत्रकार संघाचे अहेरी तालुकाध्यक्ष म्हणून मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची अविरोध निवड

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा अहेरीच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार मिलिंद खोंड तर सचिवपदी अनिल गुरनुले यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी आसिफ पठाण ,अखिल कोलपाकवार कोषाध्यक्ष पदी अमोल कोलपाकवार,सहसचिव पदी रामू मादेशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आल्लापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात रविवारी झालेल्या संघटनेच्या बैठकीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यावेळी कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश बामनकर, स्वप्नील तावाडे,महेश येर्रावार,प्रशांत ठेपाले,उमेश पेंड्याला,विस्तारी गंगाधरीवार शंकर मेश्राम,इस्रार शेख ,रफिक पठाण,अशोक आईनचवार ,स्वप्निल श्रीरामवार यांची निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व स्तरावरून अभिनंदनाचे वर्षाव होत आहे.