पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अभावी आदिवासी बहुल गावे अविकसित …माजी आमदार दिपक दादा आत्राम

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
एटापल्ली....केंद्र सरकारने मागील 27 वर्षापूर्वी राज्यातील आदिवासी बहुल गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय राज्य घटनेचे 73 वी घटना दुरुस्ती करून पेसा कायदा अंमलात आणली. या कायद्याने आदिवासी बहुल गावांमध्ये ग्रामसभा,वनहक्क व पंचायतींना जादा अधिकार मिळाले असले तरी शासन,प्रशासन व संबंधित यंत्रणेनी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व प्रचार ,प्रसार न केल्याने आजही अनेक आदिवासी तांड्या, वस्त्या व गावे अविकसित असल्याचे प्रतिपादन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी केले. ते एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथे वेंनहारा इलाका गोटूल समितीच्या वतीने पेसा आणि वनहक्क महोत्सव दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना व्यक्त केले.
कसनसुर येथील वेंनहारा इलाका गोटूल समितीकडून आयोजित पेसा व वनहक्क महोत्सवाला उदघाटक म्हणून वेनासर येथील गड भूमिया बाजुजी गावडे,सहउदघाटक म्हणून घिस्साजी मडावी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकिय अधिकारी ब्राम्हनंद पुंगाटी,वनपरिक्षेत्र अधिकारी खंडाते,आविका सभापती लालसू नरोटे,माजी सभापती बबीताताई मडावी,माजी जि.प.सदस्य संजय चरडुके, माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेख,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना माजी आमदार आत्राम म्हणाले, आदिवासी जनसमूहाच्या हितासाठी अनुसूचित क्षेत्रामध्ये हजारो वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासी जनसमुहाच्या पारंपारिक व्यवस्था,रूढी व प्रथा ,विशिष्ठ सांस्कृतिक ओळख यात बदल घडवून आणण्यासाठी पेसा कायदा केले असले तरी या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याने पेसा क्षेत्रात वास्तव्य करण्याऱ्या आदिवासी समूहाला स्वशासन निर्माण करता आले नाही आणि यात संबंधित सरकारी यंत्रणाही अपयश ठरल्याचे
ही त्यांनी म्हणाले.
यावेळी माजी आमदार डॉ. उसेंडी सह अनेक मान्यवरांनी पेसा व वनहक्क कायद्याबद्दल यथोचित मार्गदर्शन केले. पेसा महोत्सवाची उदघाटन मान्यवरांच्या हस्ते आदिवासी समुदायाच्या रिती रिवाजानुसार आदिवासी देवी देवतांची व थोर पुरुषांची प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा अर्चना करून करण्यात आली. पेसा महोत्सवासाठी कसनसुर येथे आलेल्या मान्यवरांच्या येथील मुख्य चौकातून ढोल ताशांच्या निनादात व माडिया नृत्याने भव्य स्वागत करण्यात आले. पेसा व वनहक्क महोत्सवाला कसनसुर इलाक्यातील सत्तर गावांमधील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.