गडचिरोली येथील एकता शारदा महिला मंडळाकडून हळदी कुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
गडचिरोली- येथील गणेश नगर येथे एकता शारदा महिला मंडळाच्या वतीने तिळसंक्रातीच्या दिवशी हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गणेश नगर येथे महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नुकतेच नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिडाला होता. महिला मंडळांनी पुढाकार घेऊन बचतगट सुद्धा स्थापन केला असून दरवर्षी निरनिराळे उपक्रम राबविण्यात अग्रेसर असतात. हळदीकुंकू निमित्ताने सर्वं महिला एकत्रित येऊन गेमस्पर्धा, गितगायन,डान्स व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमानंतर कटूंबियासोबत सहभोजननाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिती सिडाम,मनिषा ढवळे,
मनिषा प्रवीण चन्नावार,पल्लवी कुणाल पेंनदोरकर,वनिता सेलोटे,वर्षा भोयर, शिल्पा गव्हारे, रोशनी बुर्लीवार,संध्या आतला,अंजु मेश्राम,प्रणाली कुंभरे, वंदना पेंदाम,रजनी गेडाम, मंगला संतोषवार,सपना दत्ता यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमांत गणेशनगर येथील महिला मंडळी उपस्थित होत्या.