भामरागड तालुका

आविसं नेत्यांच्या मदतीने वटेली येथील मृतकाचे मृतदेह पोहोचले घरी !

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क

📝भामरागड तालुक्यांतील वटेली येथील दलसू सुकरु मडावी वय 61 वर्ष होते वयोवृद्ध असल्या मुळे त्यांची तब्बेत बिघडल्याने त्याचा मुलगा सोनू मडावी यांनी 108 क्रमांकाचा रुग्णवाहिका बोलावून अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरानी उपचाराअंती दलसू मडावीला मृत घोषीत केले होते.मृतक दलसु मडावी यांची घरची परिस्थिती हलाखीचे असल्याने त्यांचे मृतदेह घरी पोहोचविणे अडचणीचे ठरत होते. सदर बाब आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते तथा जि.प.माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच त्यांनी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होऊन मय्यत व्यक्ती नामे दलसू सुकरु मडावी यांच्या मृतदेह स्वगृह पाठविण्यासाठी अहेरी नागरपंचयातची वैकुंठरथ बोलावून मृतदेह भामरागड तालुक्यातील वटेली येथे पाठविण्यात आले आणि त्यांच्या नातेवाईकांना आविस नेत्यांकडून अंत्यसंस्कार कार्यक्रमासाठी आर्थिक मदत करण्यात आले.

यावेळी उपस्तीत अहेरीचे नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,प्रकाश दुर्गे,यांनी रुग्णालयात जावून भेट घेवुन सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close