येलचिल, वेलगुर व वडलापेठ या रस्त्यावरून जडवाहनांना बंदी घालण्याची मागणी !
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
📝एटापल्ली तालुक्यातील सूरजागड येथून लोहा खनिज घेवुन जाणारे जड़ वाहन एटापली वरून येलचिल,वेलगुर,वडलापेठ मार्गी नवीन रस्ता बनवून सुरू करण्यात येणार असून सदर मार्गांवर दोन्ही बाजूंनी घरे व लहान-मोठे दुकाने असून या जड़ वाहनामुळे लोहायूक्त दूर पसरणार असून नागरिकांना व व्यापारर्याना नाहक त्रास करवा लागणार आहे.त्यामूळे सदर रस्त्यांवरील जड़ वाहन बंद करावे असे मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात परिसरातील शिष्टमंडळानी दिली आहे.प्राप्त माहिती नुसार सूरजागड वरून लोहायूक्त भरून जड़ वाहन येलचिल,वेलगुर,वडलापेठ नवीन रस्त्याच्या कामाला सुरू करून या मार्गनी लोहा वाहतूक करणार आहेत,मात्र सदर रस्ता वाहतुकीस या मार्गावरून रहदरी करण्यास प्रवेश बंदी असतो,मात्र जड़ वाहन सुरू केल्यास नागरिकांना त्रास सहन करवा लागणार आहे त्यामूळे सदर रस्त्यावरून वाहन सुरू करू नये.तसेच आलापली अहेरी रस्ता नूतनीकरण करण्यात यावे,आलापली-मूलचेरा रस्त्यांच्या बाजूला मुरूम बंब भरण्यात यावी.अहेरी-महागाव रस्त्यांची नवीन रस्ता बांधकाम करण्यात यावे,अहेरी-व्येंकटपूर ते रेगुंठा पर्यंत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावे,वट्रा,आवलमरी,येतील रस्ता व पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने चौकशी करण्यात यावे.अशी निवेदन देवून मागणी केली.
यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात वेलगुरचे सरपंच श्री.किशोर आत्राम,वांगेपलीचे सरपंच श्री.दिलीप मडावी,पं.स.माजी उपसभापती सौ.गीताताई चालुरकर,वेलगुरचे उपसरपंच श्री.उमेश मौहूर्ले,इंदारामचे माजी उपसरपंच श्री.गुलाबराव सोयाम,ग्राम पंचायत सदस्य रोहीत गलबले,आसन्ना धूदी,शंकर झाडे,मनीरम गादेकर,लक्ष्मीबाई गादेकर,देवीबाई दुर्गे आदि उपस्थित होते.