सिरोंचा पोलीस स्टेशनला नवीन ठाणेदार म्हणून कुमारसिंग राठोड रुजू ..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा...येथील पोलीस स्टेशनला ठाणेदार म्हणून कार्यरत असलेले विश्वास जाधव यांची
नुकताच इतर ठिकाणी बदली झाल्याने त्यांच्या जागेवर ठाणेदार म्हणून
पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेले कुमारसिंग राठोड यांची आज सिरोंचा येथील डिजिटल मीडिया व सोशल मीडिया पत्रकार संघाकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांच्या स्वागत करण्यात आले.
आज सिरोंचा येथील डिजिटल मीडिया व सोशल मीडियाचे सर्व पत्रकार बांधवांनी पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले कुमारसिंग राठोड यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.यावेळी डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधवांनी नवीन ठाणेदारांसोबत येथील अनेक विषयांवर साधक -बाधक चर्चा केले.
याप्रसंगी डिजिटल मीडियाचे अध्यक्ष व एन.टी.व्ही.वृत्तवाहिनीचे सागर मुलकाला,स्टार महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे श्याम बेज्जनीवार,विदर्भक्रांती न्यूजचे संपादक व डिजिटल मीडियाचे सल्लागार रवी सल्लम,LA6 न्यूजनेटवर्कचे शेख हैदर,ABK युट्युबचे संपादक अशोक कुम्मरी,जे.आर.न्यूजचे शंकर जिमडे,सुधाकर शिडाम,
साईनाथ दुर्गम,मुरलीधर मारगोणी,नमस्ते महाराष्ट्र न्यूजचे नविन दिकोंडा आदी उपस्तीत होते.