माणिक्यपूर येथील आगग्रस्त दुर्गम कुटुंबाला मुलकाला फाऊंडेशन कडून जीवनावश्यक वस्तूंची मदत.

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा – तालुका मुख्यालयापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या पेंटीपाका ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या माणिक्यापूर या गावात काल दुपारी अंदाजे 04 वाजताच्या दरम्यान बानय्या दुर्गम यांचे घराला अचानक आग लागून यात घर पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. यात दुर्गम कुटुंब उघड्यावर आलेली आहे.
ही गंभीर विषयाची माहिती माणिक्यापूर गावातील गावकऱ्यांनी तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या मूलकला मदत फाउंडेशनला माहिती दिल्याने फाउंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला, आणि त्यांचे टीम माणिक्यापूर गावात भेट देऊन आगग्रस्त दुर्गम कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.
आगग्रस्त कुटुंबाला मदत करतांना मूलकला मदत फाउंडेशनचे टीमचे राजू मूलकला, कल्याण मूलकला, अनिल दुर्गम ,नवीन अकुदारी, मूलकला ,रवि पागे ,राकेश बुर्ला,आणि माणिक्यापुर गावातील गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते,