राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी सागर मुलकाला यांची निवड

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
सिरोंचा तालुका मुख्यालयात येथील इंदिरा गांधी चौकात तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नव नियुक्त जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांची उपस्थितीत कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांनी सिरोंचा तालुका कार्यकारणी गठीत करून यात सामाजिक कार्यकर्ते व डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सागर शंकर मुलकाला यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे पक्षाचे आचार-विचार ,ध्येयधोरणे, सामाजिक उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्याचे आशय व्यक्त केले.
या निवडीबद्दल सागर मुलकाला यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष गण्यारपवार, तालुका अध्यक्ष फाजील फाशा , ज्येष्ठ नेते कृष्णकुमार चोक्कमवार,सय्यद सलाम सह जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.या निवडीबद्दल सागर मुलकाला यांचे सर्वस्तरावर अभिनंदन होत आहे.