विभागीय वनहक्क समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी खमनचेरू येथील वनहक्क धारकांची नागपूरला रवाना
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : अनेक वर्षांपासून वनहक्क मिळण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या अहेरी तालुक्यातील नागरिकांना जिल्हास्तरीय समितीने वनहक्क नाकारल्याने या नागरिकांनी विभागीय समितीकडे अपिल केले होते.त्यानुसार अनेक नागरिक नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आपली बाजू मांडण्यासाठी शुक्रवारी सकाळी रवाना झाले. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडलावार यांनी खमनचेरू येथील वन्हक्काधाराकांसाठी जाण्यायेण्यासाठी बसची व्यवस्था करून दिली आहे.
अहेरी तालुक्यातील खमनचेरू,चिंतलपेठ,बोरी परिसरातील अनेक नागरिकांचे वनहक्काचे दावे २०२१ मध्ये जिल्हास्तरीय समितीने फेटाळले होते.त्यामुळे व्यथित होऊन या नागरिकांनी न्याय मागण्यासाठी विभागीय वनहक्क समितीकडे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अपिल केले होते. त्यावर विभागीय वनहक्क समितीचे सचिव तथा अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर यांनी १ सप्टेंबर रोजी सुनावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती.त्यामुळे हे नागरिक आपल्याकडील पुराव्यांसह नागपूरसाठी रवाना झाले.सकाळी ११ वाजेपर्यंत सुनावणीसाठी हजर होणे आवश्यक असल्याने अजय कंकडलावार यांनी सर्वांसाठी स्पेशल बसची व्यवस्था करून दिली. स्वखर्चाने नागपूरला यें-जा करण्यासाठी आरामदायी बसची व्यवस्था करून दिल्याने खमनचेरु सह परिसरातील वनहक्क धारकांनी माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे आभार मानत भविष्यात आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहू,असे अभिवचन दिले.
नागपूरला रवाना झालेल्यांमध्ये अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जि.प.सदस्य अजय नैताम, माजी सदस्य सुनीत कुसनाके,माजी सभापती सुरेखा आलम,सरपंच शयलू मडावी,मारपाल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,नरेश गर्गम,विनोद रामटेके,रवी भोयर,प्रमोद गोडसेलवार,लक्ष्मण आत्राम,भिवा येंका झाडे,प्रभाकर दादाजी भडके,दिनकर राजू उरोड,शंकर बक्का गोरले,सिताराम तुकाराम चूनारकर,आनंदराव यादव कुकुडकर,नितीन रावजी गोंगले,देवाजी जयराम मुंजमकर,ताराचंद दामाजी चूनरकर,मारोती जयराम मुंजमकार,संजय गंगाराम दुर्गे,पत्रू लक्ष्मण करमे,कमला शंकर करमे,कुसुम भगवान पिपरे,जयशिल विलास झाडे,दामाजी कारू चुनारकर,प्रकाश हनुमंत दुर्गे, कौशल्यबाई गजानन भडके,कलूबाई मनोहर चूनारकर,वनिता दुर्गे,लक्ष्मीबाई सोमजी वेडे,मेंगु मालू तेलसे मोतीराम देवगडे, रमेश देवगडे,गमतीदास वनकर,अशोक भसारकर,मारोती तेलसे,राजहंस भसारकर,माणिक पत्रू करमे सतिश भगवन पिपरे,बुद्धदास भसारकर, आत्माराम गांधारे,नामदेव डोंगरे,एजापती गोलजीवार,मारोती डोंगरे,लिंगाजी रामटेके,हबटू,डोंगरे,देवेंद्र दुर्गे,राकेश डोंगरे,विलास चंद्रकरसह खमनचेरू गावातील वनहक्क धारकांची समावेश आहे.