माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडून व्येंकटरावपेठा येथील मडावी कुटुंबांची सांत्वन व आर्थिक मदत..!
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
अहेरी : तालुक्यातील व्येंकटरावपेठा येथील मेंतुबाई माधा मडावी हीचे अचानक आज दुःख निधन झाले होते.या निधनाचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांना कडून आविसं व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांना मिळताच वेळेचे विलंब ना करता त्यांनी व्येंकटरावपेठा येथे जाऊन येथील मृतक मडावी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची आस्थेने सांत्वन करुन तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदतही दिली.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी सरपंच संपतराव सिडाम,शामराव राऊत माजी उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य मीनाताई गर्गम,ग्रामपंचायत सदस्य मनीषा सडमेक,शंकर सिडाम,माधव राऊत,नरेंद्र गर्गम,रवी सडमेक,रवी कुळमेथे,महेश दहागावकर,बाबुराव सडमेक प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.