धार्मिक कार्यमूलचेरा तालुका
खूदिरामपल्ली येथील मार्कंडेश्वर देवस्थान कार्यक्रमाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांची उपस्थिती

विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
मूलचेरा: खुदिरामपल्ली येथील नव निर्मित मार्कंडेश्वर देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री च्या शुभ मुहूर्तावर तीन दिवसीय महाणाम यज्ञ व यात्रेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपक दादा आत्राम उपस्थित राहून विधिवत पूजा करून भक्तगणांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी जि.प.सदस्य रविजी शहा,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके, देवस्थान समिती चे अध्यक्ष हरिपद दास, वेलगुर उपसरपंच उमेश मोहुर्ले, रवींद्र बैरागी सर,सुभाष दास, विजय बिश्वास, अमर बरमन, नबो रॉय, सुकुमार दास, रमेन दास, परेश बरमन,प्रदीप दास,मनोज दास,परेश बिश्वास,समीर दास,बाला काका,जुलेख शेख,विनोद कावेरी,जुनेद शेख,शुभम शेंडे सह हजारो भाविक उपस्थित होते.