धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी सेनगाव तहसीलदारांना दिले रक्तलिखित निवेदन
नितीन सातपुते सेनगाव तालुका प्रतिनिधी :-
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाला एस.टी प्रवर्ग आरक्षणाची अंमलबजावणी करा,धनगर समाजासाठी शासन निर्णयानुसार घोषित केलेल्या २२ योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी त्यासाठी एक हजार कोटींची तरतूद करावी,मेंढपाळ बांधवांवर होणारे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण देण्याची मागणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी दिनी धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सेनगाव तहसीलदार यांना धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य समन्वयक विकास शिंदे गंगारामजी फटागळे यांनी धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्याचे संयोजक डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वतःच्या रक्ताने लिहून रक्तलिखित निवेदन देऊन मागणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणामुळे धनगर समाजातील युवक शैक्षणिक, राजकीय, विविध योजनांपासून वंचित राहत आहे.त्यामुळे समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी सरकारने तात्काळ उपाय योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे म्हणून सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार न केल्यास महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा देण्यात आला.
यावेळी धनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्याचे समन्वयक तथा मा पं स सदस्य विकासभाउ शिंदे पंचायत समिती उपसभापती रवींद्र गडदे राज्य मल्हार तालुकाध्यक्ष गंगारामजी फटांगडे भास्करराव बेंगाळ सचिन हराळ संजय चिलगर आत्माराम कुंदर्गे लक्ष्मण गडदे सुनील शिंदे रवी लांडे विठ्ठल कुंडगर घनश्याम हराळ यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते