खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक संपन्न !

विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क …अहेरी …
*बैठकीला माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांची उपस्थिती* *अहेरी*....तालुक्यातील खांदला येथे वनहक्क अतिक्रमणधारक शेतकरी व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला अध्यक्ष म्हणून आविसं नेते व माजी आमदार दिपक दादा आत्राम तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार,पं.स.माजी सभापती भास्कर तलांडे उपस्तीत होते. या बैठकीला उपस्तीत खांदला व राजाराम परिसरातील वनहक्क अतिक्रमण धारक आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांनी आप आपली वैयक्तिक समस्यांसह गावातील समस्या ही आविस नेत्यांसमोर मांडले. यावेळी बैठकीला अध्यक्षस्थानावरून संबोधित करतांना माजी आमदार आत्राम यांनी खांदला व राजाराम आणि परिसरातील वनहक्क अतिक्रमणधारक व अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांची समस्यांसह परिसरातील नागरिकांची व गावातील समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीला उपस्तीत झालेल्या शेतकऱ्यांना माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. या बैठकीला माजी सरपंच शकुंतला कुळमेथे,माजी सरपंच ज्योती जुमनाके, माजी उपसरपंच,संजय पोर्टेत,सुरक्षा अकुदरी उपसरपंच राजाराम, हंनमंतू आकदार, नारायण कंबगौनीवार,माजी सरपंच विजय कुसनाके, नगरसेवक प्रशांत गोडशेलवार,जुलेख शेख, संदीप बडगे, माधव कुडमेथे, सुरेश पेंदाम ,माजी उपसरपंच गुरुदास पेंदाम,भगवान मडावी, वंदना अलोने,मुत्ता पोर्टेत, प्रिया पोर्टेत ,नारायण चिटकला, दुर्गा आलम,संतोष मोहूर्ले, श्रीनिवास अंबिलपुवार,स्वाती पेंदम,गोविंदा कोडापे, पांडु गावडे,खांदला व राजाराम परिसरातील शेतकरी,शेतमजूर व आविस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्तीत होते.