माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी केली मोटर सायकलने नक्षलग्रस्त चिटवेली गावाची दौरा !
विदर्भक्रांती न्यूज नेटवर्क… अहेरी..
रस्ता नसल्याने मोटर सायकलने केला खडतर प्रवास..!!
तलांडी कुटुंबाचीसांत्वन व आर्थिक मदत..!!
📝अहेरी तालुक्यातील अति संवेदनाशिल,व आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या चिटवेली गाव दामरंचा वरून १२ कि.मि.अंतरावर वसलेल्या या गांवात मात्र स्वांतत्रच्या ७५ वर्षानंतर पण मूलभूत विकास झाला नाही.या गांवात अनेक प्रमुख समस्या आवासुन उभे आहेत.मात्र प्रमुख समस्या या गावात जाण्यास आजही पक्का रस्ता नसल्याने गेल्या महिन्यात गर्भवती महिलेच्या वाटेतच जिव गेला.चिटवेली गावात १३ कुटुंब वास्तव्यास राहतात मात्र स्वांतत्र्यच्या होऊन इतकी वर्षा होत आहेत मात्र या गावाला जाण्यासाठी मुख्य मार्ग नसुन जंगलातुन पायवाटेने प्रवास करावा लागतो. नागरिकांना अनेक वर्षापासून त्रास सहन करवा लागत अनेकदां शासन प्रशासनाकडे मागणी करण्यात येत आहे मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.चिटवेली येतिल झुरी दिलीप तलांडी वय 26 वर्ष हि गर्भवती होती तिला ट्रॅकटर मध्ये दामरंचा आणत असताना ट्रॅकटर चिखलात फ़सला मग बैलबंडीनी आणत असताना वाटेतच जिव सोडवी लागली त्यानंतर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी सदर गावात भेट देवून माहिती घेतल्याचा सांगितले जात आहे.असे कित्येक घटना झाली असतील हे मात्र निश्चितच आहे.दरवेळी निवडणुक आले कि लोकप्रतिनिधी येवून मोठमोठे आश्वासन देत असतात मात्र सदर रस्त्याच्या समस्याचे निराकरण करण्यास दुर्लक्ष करत आहेत तरी प्रशासनाकडे मागणी करून रस्त्यांच्या समस्या मार्गी लावून देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांनी जि.प.माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडे केले असता सदर समस्या मी आज स्वतः मोटर सायकल घेऊन चिखलातून येतांना बगीतलो असून खूपच खडतर व जीवघेणा प्रवास आहे,यांबाबत प्रशासनाकडे निवेदन देवून मागणी करण्यात येईल असे सांगितले.तसेच चिटवेली येतील तलांडी कुटुंबाच्या सांत्वन व आर्थिक मदत हि केली.असून नागरिकांसोबत विविध समस्या बाबत सखोल अशी चर्चा केली.यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री.भास्कर तलांडे,माजी सभापती सौ.सुरेखा आलाम, दामरंचा ग्राम पंचायतचे सरपंच सौ.किरण कोडापे,ग्राम पंचायत सदस्य श्री.सम्मा कुरसाम,अहेरी नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक श्री.प्रशांत गोडसेलवार,माजी सरपंच श्री.जिलकरशाह मडावी,प्रमोद कोडापे,भास्कर कोडापे,दिवाकर आलाम,विनोद दूनलावार,पर्वाती वेलादी,गंगाराम गावडे,आशिष सड़मेक,बुंजगराव आलाम,कार्तिक आल्लडवार,सतीश चौधरी,आडवे कुरसाम,दिलीप तलांडी,मासा सिडाम,इरया कूड़मेथ,दिवाकर तलांडी,आदि होते..!!