छल्लेवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवकाला माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्याकडून आर्थिक मदत
विदर्भक्रांती न्यूजनेटवर्क
◆अहेरी◆:छलेवाडा येथील सुशिक्षित बेरोजगार युवक सूर्यप्रकाश दहेकर आपल्या काही युवक मित्राना घेऊन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सदर युवकांनी घरची परिस्थिती हलाकीची असून घर चालवणे कठीण झाले आहे,तर आम्ही आलापल्ली-सिरोंचा हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या मार्गावर गाड्याचे वर्दळ वाढले असून रेपनपल्ली येथे हॉटेल व्यवसाय करून आपल्या घराचे उदरनिर्वाह करण्याचे ठरविले आहे तर आम्हाला आपल्याकडून हॉटेल व्यवसाय करिता आर्थिक मदत ची अपेक्षा आहे अस बोलून दाखविले.
युवकांची काम करण्याची इच्छा बघून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी तात्काळ आर्थिक मदत करून या पुढे सुशिक्षित बेरोजगार युवकांनी असच हिम्मत करून कोणतेही काम करण्यासाठी लाजू नये त्यांना सर्वप्रकारच्या मदतीसाठी मी आहो असे आश्वासन दिले.
आर्थिक मदत दिल्यामुळे युवकांनी समाधान व्यक्त करून माजी आमदार दिपकदादा आत्राम यांचे आभार मानले.
यावेळी माजी जि.प.संजय चरडुके, सूर्यप्रकाश दहेकर, दिलीप दुर्गे,सुशील बोरकर, प्रेमकुमार गंधम,प्रेमकुमार झाडे,नितीन दुर्गे,किशोर कामथे,महेश सडमेक,विनोद कावेरी,माजी सरपंच विजय कुसनाके उपस्थित होते.